Breaking News

‘तो’ रस्ता अजुनही दुर्लक्षीतच

किनगावंराजा (प्रतिनिधी) दि, 02 - किनगांव राजा बस स्थानक ते पोलिस स्टेशन या रोड च्या मधात  फार मोठे गड्डे पडले आहे. येथील हा रहदारीची एकमेव  रस्ता  शुक्रवार येथील बाजाराचा दिवस आसल्याने या ठिकाणी पादचार्याची गर्दी पाहवयाला मिळते या गटारा मुळे त्यांना कमालीचा ञास सहन करावा लागत आहे.  त्यातच खाजगी वाहन धारक थोड्या चांगल्या जागेवर आपली वाहन उभी करत असल्याने पादचार्यानां गटारातुन जावे लागते. तरी सुध्दा ग्राम पंचायंत या  रहदारीच्या रत्स्यावर थोडा सुध्दा मुरूम टाकण्याची तस्दी घेत नाही.
निवडणुकी च्या वेळेला दिलेली सर्व आश्‍वासने फोल ठरली हा रस्ता एवढा चिखलमय व गटार मय झाला कि चालतानां पडण्याची दाट शक्यता ही  नाकरता् येत नाही. त्याच  प्रमाण बाजाराला सुध्दा चांगली जागा उपलध्द नाही. गावातील एकही रस्ता व्यवस्थित नाही ठिक ठिकाणी पाण्याची गटारे साठली आहे  त्या ठिकाणी जमणारे मच्छरामुळे व घाणी मुळे नागरीकांना टायफाईड. मलेरीया. चिकनगुणीया. डायरीया. असे अनेक आजार ऊद्भ्वण्याची शक्यता आहे. तसेच  नाल्याची आवस्था एवढी दयनिय झाली आहे. कि त्या तील सर्व पाणी रस्त्यावर वाहते व दुर्गंधी पसरते. ग्रामपंचायत प्रशासनाला केव्हा जाग येईल. व ते  नागरीकांच्या समस्या केव्हा दुर करतील हा मोठा प्रश्‍नच आहे. तरी संबधित आधिकार्यानीं याच्यावर वचक निर्माण करावा व नागरीकांना योग्य सुविधा द्याव्या अशी  मागणी येथील नागरीक करत आहे.