जिल्ह्यात सर्वदुर गुंजला हरीत महाराष्ट्राचा गजर
बुलडाणा, दि. 02 - राज्य शासनाने हरीत महाराष्ट्राच्या पायाभरणीसाठी महत्वांकांक्षी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार आज 1 जुलै 2016 रोजी जिल्ह्यात तब्बल तीन लाखाच्यावर वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्यात सर्वदूर वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, खाजगी व्यवस्थापनांची कार्यालये, खुली जागा, कृषि उत्पन्न बाजार समिती परिसर, आयटीआय, वन विभागांचे आगार आदी ठिकाणी प्रामुख्याने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण मोहीमेला जिल्ह्यामध्ये लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी आज सर्वप्रथम जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नगराध्यक्ष टी.डी अंभोरे, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, जिल्हा नियोजन अधिकारी दिपक सेडाम, उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, बाबासाहेब वाघमोडे, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, तहसीलदार दिपक बाजड आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. तहसील कार्यालयातही जिल्हाधिकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अपर तहसीलदार निवृत्ती गायकवाड, नायब तहसीलदार अजित शेलार, श्री. सोळंके, श्री. सोनवणे, मंडळ अधिकारी श्री. टेकाळे, शशिकांत वाघ, श्री. डब्बे, सुधाकर जाधव आदी उपस्थित होते.
त्यानंतर पंचायत समिती परिसरात मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, गटविकास अधिकारी श्री. लोखंडे यांच्यासमवेत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांनी वन विभागाच्या लाकूड आगारात वृक्षारोपण केले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक संजीवकुमार बावीस्कर, अप्पर पोलीस अधिक्षक श्वेता खेडेकर, उपवनसंरक्षक बी.टी भगत, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक एस. आर मोरे, सरपंच श्री. आडवे आदी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण केले. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या परीसरातही जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी सभापती जालींधर बुधवत, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींसह कृषि उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपण केले म्हणजे संपले असे नाही, तर या रोपट्यांचे वृक्षात रूपांतर कसे होईल याची काळजी घेतली पाहिजे. वृक्ष जगविण्यास येणार्या अडचणींवर मात करून भावी पिढीसाठी वृक्षांचे संवर्धन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शाळा-शाळांमधून सकाळीच वृक्षदिंडी काढून वृक्षारोपणाचे महत्व पटवून देण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण केले. लाकूड आगारात महिलांनीही वृक्षारोपण कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अलकाताई खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, सभापती सुलोचनाताई पाटील, अंकुश वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेमाने, शिक्षणाधिकारी अ.ज सोनावणे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल् प संचालक अनूप शेंगूलवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी उपस्थित होते.
या हरीत महाराष्ट्र चळवळीमध्ये बुलडाणा जिल्हा आज अक्षरश: हिरवागार झाला. अशाप्रकारे जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये, विविध विभागांची तालुका कार्यालये, पोलीस स्टेशन, शासकीय रूग्णालये, नगर पालिका आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार सर्वांनी हिरीरीने सहभाग घेतला.