केईएममध्ये औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण
मुंबई, दि. 02 - ‘चला झाडे लावूया..’, असे म्हणत परळ येथील महापालिकेच्या केईएम रुग्णालयात रोजंदारी कर्मचा-यांनी रुग्णालयाच्या आवारात 25 हून अधिक विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण केले. पुढील दोन-तीन दिवसांत आणखीन 75 औषधी झाडे रुग्णालयाच्या आवारात लावण्यात येणार आहेत.
जुलै महिन्याचा पहिला आठवडा ‘वृक्षारोपण सप्ताह’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच कर्मचा-यांनी एकत्र येऊन प्रत्येकाने एकतरी झाड लावा, असा संदेश दिला.
शुक्रवारी रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, उपअधिष्ठाता डॉ. मिलिंद साळवे, डॉ. प्रवीण बांगर, सहप्रमुख कर्मचारी अधिकारी गौतम लोखंडे, प्रशासकीय अधिकारी, औषध विभाग शास्त्र विभागप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
औषधी वनस्पतींचे संवर्धन, लोकांमध्ये त्यांच्या महत्त्वाबाबत जागृती करणे आवश्यक आहे. याकरता आयुर्वेदिक वनस्पतींची उत्तम जोपासना करणे अत्यंत गरजेचे असून आयुर्वेदिक वारसा पुढे चालवला पाहिजे. त्यामुळे हा उद्देश नजरेसमोर ठेवून रुग्णालयाच्या आवारात औषधी वनस्पती लावण्यात आल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.