Breaking News

ग्रंथसंग्रहालयाची 12 वाचनालये बंद

मुंबई, दि. 02 -  व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने वाचन संस्कृतीला बुरे दिन आले आहेत.
पुस्तकांची जागा मोबाईलमधील चित्रपट व गेम्सने घेतली आहे. त्यामुळे वाचनालयांतील सदस्यसंख्या घटू लागली आहे. महापालिकेच्या मुंबई मराठी याथालयाद्वारे चालवल्या जाणा-या 29 ग्रंथालयांच्या जागेवर आता 17 शिल्लक राहिली आहेत. या ग्रंथालयांत जेमतेम सदस्य उरले आहेत.
मुंबई मराठी याथसंग्रहालयाला मुंबई पालिकेच्या मालकीची एकूण 29 मोफत वाचनालये व याथालये 1965 पासून चालविण्यास देण्यात आली आहेत. या 29 वाचनालये व ग्रंथालयांपैकी 50 पेक्षा जास्त सभासद असलेल्या याथालयांच्या कराराचे नूतनीकरण 31 ऑक्टोबर 2020पर्यंतच्या कालावधीत करण्यात आले. यापैकी केवळ 17 याथालयेच सुरू आहेत; तर उर्वरित याथालयांनी कारभार गुंडाळला आहे.
मुंबई मराठी याथ संग्रहालयाच्या महापालिका अंतर्गत कुर्ला (170 सदस्य), घाटकोपर (264 सदस्य), गोरेगाव-प (552), बोरिवली-प (1858), परळ(82), गोखले रोड (44), ताडदेव (122), नळबाजार (46), डोंगरी (45), वरळी आदर्श नगर (52), कांदिवली आकुर्ली (220), बोराबाजार (34), कांजूरमार्ग-भांडुप (326), विक्रोळी (74), दहिसर (557),लोअर परळ ( 51), आग्रीपाडा (53) वाचनालयात वरीलप्रकारे नाममात्र सदस्य आहेत.
राज्य सरकारच्या 2012 सालच्या निर्णयानुसार याथालयांच्या अनुदानात 50 टक्के वाढ प्रस्तावित आहे. त्यानुसार 50 पेक्षा जास्त सदस्य असलेल्या याथालयांना 27 हजार प्रतिवर्ष व त्याखाली सदस्य संख्या असल्यास त्यांना संख्येनुसार अनुदान देण्याबद्दल या निर्णयात म्हटले आहे. परंतु मागील वर्षी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलाने महापालिकेच्या ग्रंथालयांना प्रति ग्रंथालय प्रति वर्ष 1 लाख इतके अनुदान मिळावे, अशी मागणी केली आहे.