Breaking News

जिल्ह्यात विविध ठिकाणी तीन लाखाच्यावर वृक्षारोपन

बुलडाणा, दि. 02 -

खामगाव वन विभाग
खामगाव येथे वन विभागाच्या लाकूड आगारात आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार पांडुरंग फुंडकर, आकाश फुंडकर, उपविभागीय अधिकारी प्रभाकर  बेंडे, प्र. तहसीलदार श्री. झाल्टे आदी उपस्थित होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परीसरात आमदार आकाश फुंडकर यांच्याहस्ते वृक्षारोपण  करण्यात आले. तहसिल कार्यालय परीसरातही वृक्षारोपण करण्यात आले.
सा.बा.विभाग बुलडाणा
बुलडाणा ः सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलडाणा कार्यालयाचे आवारात चंद्रशेखर शिखरे कार्यकारी अभियंता यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यता आले. या प्रसंगी  कार्यालयाचे सर्व आधिकारी व कम्रचारी उपस्थित होते. उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले. तसेच बुलडाणा शहरातील  सा.बा.उपविभागाचे आवारात रविकांत काळवाघे उपविभागीय अभियंता यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. याप्रसंगी उपविभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.  उपस्थित सर्व कर्मचार्‍यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले. सा.बा.विभागाचे विश्रामभवन, विश्रामगृह येथे सुध्दा वृक्षारोन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यालय शाखेचे  अभियंता दत्तात्रय शेळके व त्यांचे सहकारी यांनी मेहनत घेतली.
भारत विद्यालय बुलडाणा
वन विभागाच्या वतीने दि 1 ते 7 जुलै पर्यंत 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. या अनुषंगाने येथील भारत विद्यालयाच्यावतीने वृक्षारोपणाचा  कार्यक्रम घेण्यात आल. याकार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे यांनी  वृक्षारोपणकरुन केले. भारत विद्यालयाच्यावतीने 50 वृक्ष लावण्यात आले.  वृक्षारोपणाच्या कार्यात विद्यार्थी व शिक्षकांनी उत्साहानेसहभाग नोंदविला. याप्रसंगी मुख्याधापक एस आर उन्हाळे, उपमुख्याध्यापक आर एस पालवे, पर्यवेक्षक  मोहन घोंगटे यांचेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंद गुरुकूंज बुलडाणा 
येथे शाळेचे मुख्याध्यापक गजानन इंगळे, पालक प्रतिनिधी तथा पत्रकार संजय मोहिते यांनी प्रत्येकी एक झाड लावून कार्यक्रमाला सरुवात झाली. नंतर शाळेतील  वीस विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी वृक्षारोपन केले. शाळेतील सर्व फलक वृक्षसंवर्धनाशी संबंधीत चित्रे व माहिती लिहून रंगविण्यात आले. विद्यार्थ्यांनी रंगिबेरंगी  वेशभूषा व फलक आणून वनमहोत्सवाचे आकर्षक वातावरण निर्माण केले. कार्यक्रमासाठी शशिकांत पवार, सौ.स्मिता बोंडे, सौ.किरण इंगळे, दादाराव जाधव,  सौ.राजश्री अपार, कु.प्रणाली राठोड, अतुल तायडे, स्वाती सुसर, शितल साखरे , सौ.रेखा खंदारे, प्रकाश यंगड, संदीप यंगड आदि शिक्षकांनी परिश्रम घेतले.
शासकीय अध्यापक विद्यालय
शासकीय अध्यापक विद्यालय बुलडाणा येथे वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन  सकाळी 11 वाजता करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वर्ग 1  अधिकार्‍यांपैकी डॉ.चव्हाण, डॉ.कौठळकर, डॉ.तडस, डॉ.वरघट, आणि वर्ग3 मध्ये श्रीमती पाठक, श्रीमती गुळवे, शेंडे आणि वर्ग 4 कर्मचारकयांपैकी सोमवंशी,  मुठ्ठे, सुरडकर, पवार, श्रीमती पासरे हे उपस्थित होते.
जवाहर उर्दु हायस्कुल मोताळा
आजच्या वृक्षारोपनाच्या कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत जवाहर उर्दु हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यलय मोताळाच्या वतीने वृक्षारोपन करण्यात आले. या  वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात शेख सलीम ठेकेदार बांधकाम सभापती मोताळा, चौहाण, सईद कुरेशी, सामाजीक कार्यकर्ते इरफान पठाण, व प्राचार्य अलहाज  अ.मुनाफ सर, डॉ.मुजीबूर रहेमान सर, राहत अजीज, हाजी सलीम, साजीदउल्लाह, नुरुसुबाह मॅडम, फौजीया मॅउम, जन कल्याण सहकारी शिक्षक पतसंस्थाचे  अध्यक्ष व सचिव मो.अनिलस व शे.कय्युम यांच्या हस्ते वृक्षांचे रोपन करण्यात आले. यावेळी शाळेच्या परिसरात 40 वृक्ष लावण्यात आले. तसेच रोपांचे वाटप  करण्यात आले.
राजे छत्रपती कला महाविद्यालय
राजे छत्रपती कला महाविद्यालयात 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे संचालक सदस्य गजानन मालठाणे, व एन.एस.एस.अधिकारी  प्रा.डॉ.शहिदा नसरीन व 20 स्वयंसेवक यांनी 20 वृक्ष दत्तक दिली. प्रा.डॉ.गोविंद गायकी यांच्या हस्ते वृक्षारोपन करुन कार्यक्रमाला सुुरुवात करण्यात आली.    या प्रसंगी प्रा.शशिकांत सिरसाट, प्रा.स्वप्नील दांदडे, प्रा.डॉ.वानखेडे. प्रा.डॉ.भगवान गरुडे, प्रा.विजय मोरे, प्रा.डॉ.कामिनी मामर्डे, प्रा.डॉ.दिपक लहासे, प्रा.डॉ.रिठे,  प्रा.डॉ.नितीन जाधव, विष्णु उबाळे, प्रा.विनोद राठोड, संदिप तोटे, रामेश्‍वर चव्हाण, तसेच अंभोरे, हिना शेख, आम्रपाली झिने, तनवीर परवीन, बुशरा आफरीन  यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.