Breaking News

युपीएससीच्या परीक्षेत धनश्री पाटील हिचे यश

सातारा, दि. 1 (प्रतिनिधी) : माण तालुक्यातील गोंदवले बु। येथील धनश्री पाटील हिचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत अवघ्या एका गुणाने यश हुकले होते. दरम्यान, बुधवारी रात्री केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रतीक्षा यादीत असणार्‍या परीक्षार्थी उमेदवारांच्या यादीला मान्यता दिल्याने धनश्री पाटील हिचे आता भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पुर्ण झाले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. त्यामध्ये 1700 हून अधिकजण यशस्वी झालेे. अवघ्या एका गुणाने धनश्री पाटील हिचे यश हुकले होते. त्यामुळे तिचे नाव प्रतीक्षा यादीत होते. जे उमेदवार गुणवत्ता यादीत होते मात्र त्यांना आयएएस अथवा आयपीएस व्हाचे होते आणि त्यांना हे केडर मिळाले नाही ते प्रशिक्षणासाठी रुजू होत नाहीत. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग प्रतीक्षा यादीत असणार्‍या उमेदवारांना मान्यता देते. बुधवारी रात्री प्रतीक्षा यादीत असणार्‍या 89 उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. धनश्री पाटील हिचे वडील धनाजी पाटील हे सातारा जिल्हा परिषदेत स्वच्छता विभागात कार्यरत आहेत.