Breaking News

तेलगु भाषेतील सैराटमध्ये रिंकू ?

अभिनयाचा कोणताही वारसा नसतांना देखील सैराटची अभिनेत्री रिंकु राजगुरू ने आपल्या पदापर्णातच आपल्या नैसर्गिक अभिनयाची झलक दाखवत पे्रक्षकांसह समीक्षकांचीही वाहवा मिळवली आहे, सैराटचा तेलुगू भाषेतही रिमेक होणार असून या रिमेकचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार आहे. याविषयी रिकुं ला विचारले असता,  सैराटच्या तेलुगू रिमेकमध्ये मला आर्ची साकारायला आवडेल, जर नागराज अण्णांनी संधी दिली तर मी ही भूमिका पार पाडण्यास उत्सुक असल्याचे तिने सांगितले आहे.
झी प्रोडक्शन आणि रॉकलाईन व्यंकटेश यांच्यासह तेलुगूतील सैराटचा रिमेक बनविण्यात येत आहे. मात्र अद्याप कलाकांराची निवड झालेली नसल्याचे नागराज म्हणाले आहेत.