राज्यभरात 2 कोटी वृक्षारोपणाचा शुभारंभ
मुंबई, दि. 01 - वनविभागाकडून सुरु करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यभर वृक्षरोपणाची मोहीम सुरु झाली. राज्यभरात एकूण 2 कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरेंच्या हस्ते सोनचाफा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताम्हण, सुधीर मुनगंटीवार आणि मकरंद अनासपुरेंच्या हस्ते कडूलिंब, कॉमेडी किंग कपिल शर्मा बकूळ तर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पिंपळाचे झाड लावण्यात आले.
उद्धव ठाकरे यांनी लावलेल्या रोपट्याला मी माती आणि खत घातले आहे. हे रोपटे आम्ही वटवृक्षामध्ये परिवर्तित करू आणि संपूर्ण महाराष्ट्र हरित करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणातणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी एकाच व्यासपीठावर आले होते. उद्धव ठाकरे म्हणाले, मी या कार्यक्रमाला येणार का, असा प्रश्न मला विचारण्यात आला. त्यावेळीच मी कार्यक्रमाला जाणार असल्याचे स्पष्ट केले. मी इथे अपशकून करायला आलेलो नाही. चांगल्या कामाच्या पाठिशी आम्ही निश्चितच आहोत. गरज पडली तर तुमच्या खांद्याला खांद लावून उभा राहीन, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राज्यपाल सी विद्यासागर राव, राज्याचे वन आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे कौतुक केले असून, राज्यातील सर्वांनी या मोहिमेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.
वृक्षारोपण उपक्रमाचे मोदींकडून कौतुक
महाराष्ट्र सरकारच्या वृक्षारोपण उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. मोदी यांनी ट्विटीद्वारे म्हटले आहे की, एका दिवसात दोन कोटी रोपांचे वृक्षारोपण करण्याचा चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाने या उपक्रमाला पाठिंबा देऊन यात सहभागी व्हावे असे आवाहन करतो‘ असे मोदी यांनी म्हटले आहे.