Breaking News

मुंबईत मुसळधार पाऊस ! मध्य रेल्वेची सेवा खोळंबली

मुंबई, दि. 01 -  मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवार सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून, रस्ते वाहतूक आणि लोकल सेवा खोळंबली आहे. दादर, लोअर परळ, वरळी भागात जोरदार पाऊस पडत असून ठिकठिकाणी ट्राफीक जामच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वांद्रे, माहिम, सांताक्रुझ या उपनगरांत देखील मुसळधार पाऊस पडत आहे. जेव्हीएलआरवर ‘एल अँड टी’जवळ टेम्पो बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. रस्ते वाहतुकीपाठोपाठ लोकल सेवा देखील रखडली आहे. मध्य रेल्वेची सेवा तब्बल अर्धा तास उशीराने सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ठाणे-कळवा दरम्यान लोकलमध्य तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.