Breaking News

कर्मचारी जाणार 11 जुलैपासून संपावर

नवी दिल्ली, दि. 01 -  सातव्या वेतन आयोगातील शिफारशींवर नाराज झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांनी येत्या 11 जुलै रोजी संप पुकारण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेतन आयोगाच्या शिफारशींना काल मंजुरी दिली. त्यानुसार 23.5 टक्के वेतनवाढ मिळणार आहे. सुमारे 47 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 53 लाख निवृत्तिवेतनधारक असे एक कोटी जणांना याचा थेट लाभ होईल.