काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन जण जखमी
श्रीनगर, दि. 02 - काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन जखमी झाले आहेत. पोलीस आणि दहशतवाद्यांतील ही चकमक बराच काळ सुरू होती.
बडगाम जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या चरार-ए-शरीफ भागात दहशतवाद्यांनी दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांवर हल्ला चढवला. यात पोलीस अधिकारी अब्दुल रशीद यांच्यासह दोन नागरिक जखमी झाले आहेत.
या हल्ल्यानंतर परिसरात सैन्यदलाचे जवान दाखल झाले असून मोठया प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने घेतलेली नाही. काश्मीर खो-यात गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.