Breaking News

हमदाबाज येथे खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण

सातारा, दि. 2. (प्रतिनिधी) : वनविभागामार्फत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हमदाबाज येथे वृक्षरोपण करुन 2 कोटी वृक्ष लागवड अभियानाचा प्रारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, तहसीलदार राजेश चव्हाण, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे, ग
टविकास अधिकारी सचिन घाडगे, नायब तहसीलदार अमर रसाळ, सरपंच अर्चना ढाणे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे उपस्थित होते.
हमदाबाज येथील वनविभागाच्या 5 हेक्टर क्षेत्रात 1390 वृक्षांची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ, उंबर, बेल, जांभुळ, पायर, चिंच अणि मोहा या वृक्षांचा यामध्ये समावेश आहे. डॉ. अविनाश पोळ, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिक्षक बाबासाहेब कुकडे, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, आदर्श कॉम्प्यूटर संस्थेचे विद्यार्थी, शेट चंदनलाल मुथा अर्याग्ल वैद्यक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या इको क्लबच्या विद्यार्थीनी, अनिरुध्दाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आदींचा यामध्ये सहभागी झाले होते.