Breaking News

चीनच्या नागरिकांनी इस्लामचा त्याग करावा!

लाहोर, दि. 02 - इस्लाम धर्माचे चीनमध्ये कुणीही पालन करणार नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या देशात राहणा-या प्रत्येकांनी इस्लामचा त्याग करावा, असे आवाहन केल्याने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि 26/11 चा सूत्रधार हाफिज सईदने जोरदार टीका केली. चीन हा पाकिस्तानचा सच्चा मित्र आहे, पण या देशाने आमच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, असा इशारा सईदने दिला.
लाहोर येथे एका धार्मिक सभेत बोलताना तो म्हणाला की, चीनने प्रत्येक संकटात पाकला सहकार्य केले आहे. पण, जिनपिंग यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी आपले हे वक्तव्य मागे घ्यायलाच हवे. चीनने अशाप्रकारे आमच्या भावनांशी
खेळ करू नये. दरम्यान, जिनपिंग यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी इस्लामाबादेतील चीनच्या राजदूताचीही भेट घेणार असल्याचेही त्याने यावेळी जाहीर केले. चीनबाबत संताप व्यक्त करताना मात्र त्याने चीनच्या संतापाचा भडका उडणार नाही, याची काळजीही घेतली.आपल्या
देशातील लोकांना इस्लामचा त्याग करण्याचे आवाहन करताना चीनने पाकला गृहीत धरू नये. आम्ही मैत्रीचा सन्मान करतो. पण, याचा अर्थ आमच्या धार्मिक भावनांशी कुणीही खेळ करावा, हे आम्ही कदापि मान्य नाही, असेही तो म्हणाला.विशेष म्हणजे, हाफिज सईदने यापूर्वी अनेकदा भारत, इस्रायल, अमेरिका आणि अन्य पाश्‍चिमात्य देशांवर टीका करताना अक्षरश: विष ओकले आहे. पण, चीन आणि पाकमध्ये घनिष्ट मैत्रीचे संबंध असतानाही त्याने चीनवर अशा प्रकारची टीका केल्यामुळे पाकमधील राज्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.
काय म्हणाले होते जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अलीकडेच बीजिंगमध्ये आयोजित एका धार्मिक परिषदेत चीनमधील विशेषत: शिनजियांग प्रांतातील नागरिकांनी इस्लामचा धर्माचा त्याग करावा आणि सरकारचे धोरण म्हणून केवळ माक्रि्सस्ट राष्ट्रवादच स्वीकारावा, असे स्पष्ट केले होते.