2 लाख नागरिक युद्धामुळे निर्वासित
काबूल, दि. 02 - गेल्या तीन वर्षांत अफगाणिस्तानमध्ये युद्धामुळे 12 लाखांपेक्षा जास्त लोकांवर आपले घर सोडून देशातच निर्वासित म्हणून राहण्याची वेळ आली आहे, असे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे. अफगाणिस्तान सरकार आणि जागतिक समुदायाने या निर्वासितांच्या समस्येवर तोडगा काढावा, असे आवाहनही संस्थेने केले आहे.
काबूलमध्ये अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने आपला अहवाल जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, अफगाणिस्तानमधील युद्धाला 15 वर्षे होत असून निर्वासितांचा प्रश्न गंभीर झाला आहे. हे निर्वासित अत्यंत वाईट अवस्थेत जीवन जगत आहेत. अमेरिकेने 2001 मध्ये तालिबानचे सरकार उलथवून टाकल्यानंतर तालिबानने युद्ध सुरू केले आहे. 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय लष्करी दले अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर तालिबानच्या कारवाया वाढल्या आहेत. 2015 या एका वर्षातच 11,002 नागरिक ठार किंवा जखमी झाले आहेत.
अफगाण सरकारने निर्वासितांसाठी पश्चिम हेरात, उत्तर बल्ख आणि नांगरहार या तीन भागांत काही कार्यक्रम सुरू केले आहेत. अफगाणिस्तानच्या निर्वासितांसाठीच्या मंत्रालयाचे माध्यम सल्लागार हाफिज अहमद मियाखैल यांनी मात्र अॅम्नेस्टीने निर्वासितांच्या दिलेल्या संख्येशी असहमती दर्शवली आहे. ते म्हणाले की, निर्वासितांचा संख्या 10 लाख एवढी आहे. युद्ध हेच निर्वासित होण्याचे एकमेव कारण नाही, तर पूर आणि भूकंप यासारखी नैसर्गिक संकटेही त्यासाठी कारणीभूत आहेत.