Breaking News

वीजप्रश्‍नी आ. बोंद्रेंनी एम.एस.ई.बी अधिका-यांना धरले धारेवर

चिखली, दि. 06 - एम. एस.ई.बी अधिका-यांनी आपल्या कामांचा वेग वाढवून शेतकरी व नागरीकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशा सुचना आमदार राहुलभाउ बोंद्रें यांनी वीज वितरण कंपनी कार्यालय चिखली येथे झालेल्या वीज दरबारात अधिका-यांना केल्या. तसेच डी. पी. डी. सी कडे पैसा उपलब्ध असतांना एम.एस.ई.बी. कडून योग्य वेळी मागणी होत नाही, नंतर निधी मिळाला नाही असे सांगून प्रस्तावित कामे मार्गी लागत नाहीत अशी खंत आ. राहुलभाउ बोद्रे यांनी व्यक्त केली. कामे निधीअभावी प्रलंबीत न राहता तालुक्यातील कामांसाठी अनेक योजनांच्या माध्यमातुन निधीची मागणी करून कामे पूर्ण करा. तसेच अनेक ठिकाणच्या लाईनमनच्या बदल्या झाल्या परंतू सदर ठिकाणी दुस-या लाईनमनला नियुक्त्या दिल्या गेल्या नाही, ही गंभीर बाब असून या जागी तात्काळ लाईनमनच्या नियुक्या करा असे सांगत अधिका-यांना धारेवर धरले. यावेळी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी डॉ. सत्येंद्र भुसारी, बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील, शहरअध्यक्ष प्रदिप पचेरवाल, जि.प.सदस्य अशोकराव पडघान, बबनराव गि-हे, पप्पुसेठ हरलालका, डॉ. इसरार यांच्यासह एम. एस. ई. बी चे अधिकारी सर्कल अधिकारी श्री. सोनकुसळे, डीव्हीजन अधिकारी बनसोडे साहेब, सहाययक अभियंता मिश्रा, यांची प्रमुख उपस्थिती होती.
वीज दरबारात पुढे बोलतांना आमदार राहुलभाउ बोंदे्र म्हणाले की, मागील वीज दरबारात अश्‍वाशीत काही कामे झालीच नाहीत केवळ कागदी घोडे नाचविल्याचे आढळून आल्याबददल संबधित अभियंत्यांची चांगलीच कानउघडणी केली.शेतक-यांच्या वीज पुरवठयासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. यामध्ये जिल्हा नियोजन, इन्फ्रा, पंडित दिनदयाल ग्रामज्योती सारख्या महत्वपर्ण योजनांमधून पाठपुरावा करून अधिका-यांनी कामे पुर्ण करून घेतली पाहिजे. विहरीला पाणी असते परंतू वीजेच्या समस्येमुळे पाण्याअभावी पिके वाळून जातात, अशी उदाहरणे आपल्या समोर आहेत. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्येसारखा मार्ग स्विकारतात शेतकरी पैसे भरून आपल्या कार्यालयकाडे दोन-दोन वर्ष कार्यालयात चकरा मारून देखील कामे प्रलंबित आहेत. यामुळे अधिका-यांनी जबादार राहुन नागरिकांचे तात्काळ प्रश्‍न मार्गी लावले पाहिजेत. यावेळी सोनकुसळे यांनी सुध्दा कुठल्याही सबबी सांगून टोलवाटोलवी करू नका नियोजनपुर्वक गांभीर्याने कामे करा अस समज अधिका-यांना दिली.
वीज दरबारात शेतक-यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले यामध्ये अनिल पळसकर यांनी थेट अधिका-यांच्या कारभाराव बोट ठेवले. कास्तकारांनी पैसे भरून वर्ष उलटले तरी कामे प्रलंबित आहेत. अधिका-यांना जाब विचारायला गेल्यास ते दाद न देता उडवाउडवीची उत्तरे देतात यामुहे ग्राहक त्रस्त झाले अशा प्रकारे अधिका-यांच्या कारभारावर आपला संताप व्यक्त केला. याप्रसंगी इतरही शेतक-यांनी प्रश्‍न उपस्थित केले यामध्ये अमान भाई, प्रकाश चव्हाण, राजेंद्र वाघमारे, शिवनारायण म्हस्के विठठल झगरे, भास्कर बंंमाळे, समाधान गिते, पाटीलबा पवार, साहेबराव भुसारी, पुरूषोत्तम हाडे यांनी अधिका-यांना धारेवर धरले.यावेळी बाजार समिती संचालक शिवनारायण म्हस्के, ज्ञानेश्‍वर सुरूशे, भारत म्हस्के, आसिफ भाई, किशोर कदम, राणा सुनिलकुमार सुरडकर, साहेबराव पाटील, दिपक लहाने, सचिन शिंगणे, साहेबराव आंभोरे, भास्कर चांदोरे, राजेश चव्हाण, अभियंता श्री गोरटकर, काटामुरे, टिकार, भुसारी, चव्हाण यांच्यासह तालुक्यातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.