वाढदिवसाच्या दुप्पट झाडे लावून साजरा केला मुलीचा वाढदिवस
बुलडाणा, दि. 06 - शहर पोलीस स्टेशचे कर्मचारी पो.कॉ. दिगंबर कपाटे यांनी त्यांची लहान मुलगी कु.दिपा हिच्या 4 थ्या वाढदिवसानिमित्त पोलीस लाईनमध्ये 8 झाडे लावून ते जगवीण्याचा संकल्प 2 जून रोजी केला. त्यावेळी या नवीन उपक्रमाला अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती श्वेताताई खेडकर व बुलडाण्यातील पर्यावरण मित्र मंडळी पोलीस कर्मचारी महिला उपस्थित होत्या.
या नवीन उपक्रमा बद्दल पर्यावरण प्रेमी खोत यांनी दिगंबर कपाटे यांच्या सारखे इतर पोलीस कर्मचारी यांनी सुध्दा असेच झाडे लावण्याचा उपक्रम घ्यावा असे आवाहन केले.
या नवीन उपक्रमा बद्दल पर्यावरण प्रेमी खोत यांनी दिगंबर कपाटे यांच्या सारखे इतर पोलीस कर्मचारी यांनी सुध्दा असेच झाडे लावण्याचा उपक्रम घ्यावा असे आवाहन केले.