न.पा.मुख्याधिका-यांना सुरक्षा पुरवाः इंटक
बुलडाणा, दि. 04 - मुख्याधिकारी संजय ओहोळ यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचा निषेध इंटकचे जिल्हा उपाध्यक्ष धिरज अवसरमोल यांनी आज 1 जून रोजी एकापत्रकाद्वारे केला आहे. ओहळ यांच्यावर झालेली शाईफेक पहाता भविष्यात त्यांच्यावर एखादा हल्ला होवू शकतो म्हणून त्यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 30 मे रोजी मुख्याधिकारी तथा नगरअध्यक्ष यांच्यासह दालनामध्ये लोकांच्या समस्या निवारणार्थ काम करीत असता त्या ठिकाणी काही समाज कंटक त्यांना भेेटण्यासाठी आलो आहे असे सांगितले असता मुख्याधिकारी यांनी थोडाही विलंब न करता आपल्या दालनामध्ये येण्याची परवानगी दिली. आलेले समाज कंटक हे पूर्व नियोजित कार्यक्रम आखून मुख्याधिकारी यांना अपमानित तथा जिवीत्वास हानी पोहचवण्याच्या उद्देशाने आले होते. दालनामध्ये प्रवेश करताच कामा बद्दल कोणतीही विचार पूस न करता सरळ थेट मुख्याधिकारी यांच्या दिशेने धावले आणि कोणताही विचार न करता कायद्याच्या विरोध जाऊन एका अधिका-याच्या अंगावर सर्व प्रथम काळी शाही फेकली तथा मुख्याधिकारी यांच्या शरीरास ईजा पोहोचण्याचा निर्धार त्यांच्या मनात होता. असा एखादा प्रकार भविष्यात होवू नये म्हणून मुख्याधिकार्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी असे अवसरमोल यांनी म्हटले आहे.