विकासपर्व अभियान तळागाळात पोहोचवा ः सौ. श्वेताताई महाले
बुलडाणा, दि. 04 - भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने विकासपर्व हे अभियान राबविण्यात येत आहे. दोन वर्षामध्ये केंद्र सरकारने आणि दिड वर्षामध्ये राज्य सरकारने राबविलेल्या विविध लोकोपयोगी योजनांची माहीती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे. यापुर्वीच्या सरकारपेक्षा या सरकारने अनेक लोकाभिमुख योजना राबवून नागरीकांना दिलास दिला आहे. तेव्हा अशा सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन भाजपा नेत्या सौ.श्वेताताई महाले पाटील यांनी केले.
तालुक्यातील चांधई नजिकच्या बारीवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन समारंभामध्ये त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाच जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर काळ हे होते. तर जिल्हा उपाध्यक्ष सुरशअप्पा खबुतरे, तालुका अध्यक्ष सुनिल पोफळे, ग्रामपंचायत सदस्य सौ.रेखाताई कतोरे, रतन कतोरे, तेजराव सवडतकर, भाऊराव सवडतकर, अरुण सवडतकर, गणेश सवडतकर, दत्ता कतोरे, सुखलाल कतोरे, शेषराव सवडतकर, भारत दामधर, किसन राऊत, अर्जुन राऊत, दिपक राऊत, विष्णु हुसे, राजु राऊत, गणेश उंबरकर, संतोष सवडतकर, दत्ता सवडतकर, गजानन राऊत आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.