Breaking News

संवेदनशील राहून तत्काळ कर्ज वितरण कराः आ.बोंद्रे

चिखली, दि. 04 -  तालुक्यातील शेतक-यांच्या कर्ज पुनर्गठण व नुतनीकरणात अनेक अडचणी येत असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले होते. कर्ज पुनर्गठण व कर्ज नुतणीकरणाचा  प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी चिखली मतदार संघाचे आमदार राहुल बोद्रें यांनी आज स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात बॅक अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती विष्णू पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सचिन शिंगणे, ज्ञानेश्‍वर सुरूशे, शिवनारायण म्हस्के, विजय पाटील, बिंदुसिंग इंगळे,दयानंद खरात, भारत म्हस्के, रामभाउ जाधव, कॉ. क अल्पसंख्याक विभागाचे डॉ. इसरार, राजु रज्जाक, आमिन सेठ, प्रविण परबाळे, नाबार्डचे सुमेध मेश्राम, स्टेट बॅक उंद्रीचे सारंग संगवाई, जिल्हा सहकारी बॅकेचे जिल्हा समन्वयक राजेेंद्र परब, एसबीआय चिखलीचे सुधीर खुरांडे, कमलेश चंगवाल, नायब तहसीलदार आर. एस कानडजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार राहुल बोंद्रे यांनी दुष्काळामुळे शेतक-यांची हालाकीची परिस्थिती असून बॅकानी शेतक-यांना नाहक त्रास न देता 15 जून पर्यत शेतक-यांचे कर्ज पुनर्गठण करून कर्जाचे वितरण करा अशा सूचना करत शेतक-याबददल संवेदना बाळगा असे सांगितले.
चिखली तालुक्यात शेतकर-यांना कर्ज पुनर्गठण व कर्ज नुतणीकरणसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याच अडचणींचा निपटारा करण्यासाठी आमदार राहुल बोंद्रे यांनी बॅक अधिका-यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये शेतक-यांनी विविध प्रश्‍न उपस्थित करून बॅक अधिका-यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. शेतक-यांच्या व्यथा एैकूण अधिकारी देखील त्यांच्या समस्या लक्ष देवून बैठकीत ऐकूण घेत होते. यावेळी सर्च रिपोर्ट, हैसियतचा दाखला, मॉडगेज अशा विविध प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर बॅक अधिका-यांनी सांगितले की यापूढील कर्ज प्रकरणात हैसियतच्या दाखल्याची तसेच एक लाखाच्या आतील कर्ज प्रकरणांना मॉडगेजची आवश्यकता भासणार नाही असे सांगितले. शेतकरी बॅकेपंर्यंत पोहचल्यास आम्ही त्यांचे कर्जप्रकरणे रितसर मार्गी लावू, तसेच आम्ही शेतक-यांना त्रास देत नसुन बॅकेचे काही नियम आहेत. त्या नियमात बसून लवकरात लवकर कर्ज प्रकरणे मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न कायम असतो असे सांगितले.  यावेळी ज्ञानेश्‍वर सुरूशे, भारत म्हस्के, डासा पाटील, गोकुळ शिंगणे, लक्ष्मण अंभोरे, गजानन मोरे, ईश्‍वरराव इंगळे, अशोकराव मगर, वाघमारे सर, दिपक हाके, साहेबराव अंभोरे, साहेबराव पाटील, संरपंच विठठल इंगळे, रामदास रसाळ, पंजाबराव पवार, ताहेर भाई, लक्ष्मण भिसे, रूपराव साबळे, कैलास खंदारे, दिपक खरात, भावसार, एनटी काताजे, सुभाष पाटील, अय्युब शेख, चव्हाण, शिवाजी साखरे रमेश डुकरे यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.