जगातील अव्वल खेळाडूंच्या यादीत भारताचे दोन दिग्गज खेळाडू
नवी दिल्ली, दि. 04 - भारताचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांची नावे ‘इएसपीएन वर्ल्ड फेम 100 रँकिंग’ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. नुकतीच जगातील अव्वल 100 खेळाडूंची यादी ‘इएसपीएन’ने घोषित केली आहे. यामध्ये दोन क्रिकेटपटूंचा समावेश आहे आणि ते दोन्हीही भारतीय आहेत. ही ‘टीम इंडिया’ आणि भारतीय क्रीडारसिकांसाठी अभिमानाची गोष्ट असून या यादीमध्ये ‘टीम इंडिया’चा एकदिवसीय कर्णधार, टी-20 कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांचा समावेश आहे.
‘इएसपीएन वल्र्ड फेम 100 रँकिंग’ मध्ये कोहली आठव्या तर धोनी तेराव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याशिवाय भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झालाही या यादीमध्ये संधी मिळाली आहे. सानिया 41 व्या क्रमांकावर विराजमान आहे. ही यादी खेळाडूंचे वेतन, सोशल मीडियावरील फॉलोअर्स, एंडार्समेंट आणि गुगल सर्च पॉप्युलॅरिटीच्या आधारे बनविण्यात आली आहे. या यादीच्या अव्वल स्थानी फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. द्वितीय क्रमांकावर अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू लेब्रॉन जेम्स आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी तृतीय क्रमांकावर आहे. चौथ्या स्थानावर फुटबॉलपटू नेमार आहे. तर पाचव्या स्थानावर टेनिस खेळाडू रॉजर फेडर आहे. जगातील अव्वल खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे.