अमेरिकेतील विमानतळावर भारतीयांना विशेष सवलत
वॉशिंग्टन, दि. 04 - भारताने अमेरिकेच्या ‘ग्लोबल एन्ट्री प्रोग्राम‘ नावाने ओळखल्या जाणार्या ‘इंटरनॅशनल एक्स्पडिटेड ट्रॅव्हलर इनिशिएटिव्ह‘ करारावर सह्या केल्यामुळे अमेरिकेत जाणार्या भारतीयांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे.
अमेरिकेसोबत अशा प्रकारचा करार करणारा भारत हा नववा देश आहे. याअंतर्गत नोंदणी करणार्या सामान्य भारतीय प्रवाशांना अमेरिकी विमानतळावर उतरल्यानंतर त्वरित सुरक्षा मंजुरी मिळणार आहे. या विशेष करारावर भारताचे अमेरिकी राजदूत अरुण के. सिंह आणि अमेरिकी कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाचे डेप्युटी कमिशन्र केविन के. मॅक्लीनन यांनी स्वाक्षर्या केल्या. दोन्ही देशांकडून संयुक्तपणे चौकशी होऊन सुरक्षा मंजुरी मिळालेल्या भारतीय नागरिकांना काही ठराविक अमेरिकी विमानतळांवर असलेल्या स्वयंचलित किऑस्कमार्फत अमेरिकेत लवकरात लवकर प्रवेश मिळेल. येत्या काही महिन्यांमध्ये कराराची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, असे दोन्ही देशांनी सादर केलेल्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आले.