संदीप पाटील टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी उत्सुक
मुंबई, दि. 04 - टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयच्या सिनियर निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील हे उत्सुक असून या पदासाठी संदीप पाटील यांनी अर्जही केला आहे. त्यांच्यापाठोपाठ निवड समिती सदस्य विक्रम राठोड, प्रवीण अमरे, लालचंद राजपूत आणि ऋषीकेष कानिटकर अशी बडी नावे देखील या पदाच्या शर्यतीत दाखल होण्याची शक्यता आहे. पाटील यांच्या निवड समिती अध्यक्षपदाची चार वर्षांची टर्म आता अखेरच्या टप्प्यात आहे.
संदीप पाटील यांना आपण अचानक मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत का दाखल झालात असा प्रश्न विचारला असता एका वृत्तवाहिनीला सांगितले की, खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर माझी खरी करियर ही प्रशिक्षक म्हणूनच उभी राहिली आहे. मी गेली 20 वर्ष प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच समजेल.