जानेफळ परिसरातील मोटार सायकल चोरांची टोळी गजाआड
जानेफळ, दि. 03 - जानेफळ परिसरात मोटारसायकल चोरुन त्यामध्ये थोडा हेरफार करुन परत त्या मोटारसायकली लोकांना विकण्याचे काम काही लोक करीत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन पोलीसांनी सापळा रचुन या परिसरातील एक टोळी जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
मागील बरेच दिवसापासून जानेफळ परिसरात दुचाकी वाहनांच्या चोर्यांमध्ये वाढ झाल्याने दुचाकी वाहन चोरीतील आरोपींचा शोध घेणे कामी संजयकुमार बाविस्कर पोलीस अधिक्षक, श्रीमती श्वेता खेडकर, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेेचे पोलीस निरीक्षक फुंदे यांनी आरोपी शोधकामी पथक तयारक रुन गोपनिय माहिती काढून अमोल रुप
चंद जोरेवार वय 24 रा. जानेफळ याने जानेफळ गावात व परिसरामध्ये मोटार सायकलच्या चोर्या केल्या असून त्या मध्ये काही फेर फार करुन त्या मोआर सायकली जानेफळ व परिसरातील काही लोकांना विकत असल्याबाबत तसेच जानेफळ येथे चोरटयांनी चोरलेल्या दुचाकी मोटार सायकली काही लोक अवैधरित्या जवळ बाळगून त्याचा वापर करीत असल्याबाबत खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन रुपचंद जोरेवार वय 24 रा.रमाई नगर जानेफळ यास ताब्यात घेवून त्याच्याजवळून जानेफळ परिसरातून चोरुन नेलेली एक काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कपंनीची मो.सा. क्र. एमएच 28 जी 2562 अशा वर्णणाची किंमत अंदाजे 40 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला. तर पॅशन प्रो एमएच 28 एई 346 व होन्डा शाईन क्रमांक एमएच 28 वी 7130 अशा वर्णणाच्या मोटार सायकली चोरल्याची कबुली दिल्याने पोस्टे जानेफळ येथील 3 दुचाकी वाहनांचे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
तसचे शे.चांद शे.अफजल वय 35 रा.इंदिरा नगर जानेफळ यांचे घराची मिळालेल्या माहितीप्रमाणे झडती घेतली असता घरामध्ये एक लोखंडी जांबीया ज्याला काळ्या रंगाचे कवर असलेले जांबीया अवैधरित्या बिनापरवाना बेकायदेशीररित्या मिळून आला. तसेच एक काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटार सायकल क्र.एमएच 20 बीपी 3855 असा मुद्देमाल मिळून आल्याने त्याचे विरुध्द अप क्र.100/16 कलम 4, 25 आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच संशयास्पद दुचाकी बाळगल्या प्रकरणी उटी व जानेफळ परीसरातील 7 लोकांना ताब्यात घेवून त्यांचे जवळून संशयास्पद दुचाकी आढळून आल्या आहेत. सदर माल जप्त करण्यात येवून त्यांचेविरुध्द कलम 41 (1) (4) जा.फौ. प्रमाणे कार्यवाही करण्यता येत आहे. सदर कार्यवाही मध्ये पोउपनि दिनकर गोरे, पोहेकॉ अनील भुसारी, विकास खानझोडे, पो.नी.रघुनाथ जाधव, दिपक पवार, गजानन जाधव, प्रकाश राठोड व राजु ठाकुर सर्व स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा तसेच पोस्टे जानेफळ येथील पोउपनि ज्ञानेश्वर थोरात व मपोकॉ सुनिता इंगळे यांचा सहभाग होता.