Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन

बुलडाणा, दि. 0 3 - पुण्यश्‍लोक अहिल्याबाई  होळकर यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे अन्य उपस्थित अधिकार्‍यांनी पुष्प अर्पण केले.   यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक सेडाम, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश घेवंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. खांदे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.