बालविवाहाच्या कुप्रथेत हिंदू धर्मीयांची आघाडी
नवी दिल्ली, दि. 02 - देशभरात बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात असली तरीही अजूनही देशात बालविवाहाचे प्रमाण उल्लेखनीय आहे. देशात सुमारे 12 लाख विवाह हे 10 वर्षाच्या आतील वयोगटात होत असून हे विवाह होणार्या कुटुंबांपैकी 84 टक्के कुटुंब हिंदू तर 11 टक्के मुस्लिम धर्मीय असल्याची माहिती ‘इंडिया स्पेंड’च्या सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाली आहे.
देशातील बालविवाहाला बळी पडलेल्यांपैकी 7 लाख 84 हजार विवाहित या मुली अल्पवयीन असून त्यापैकी 80 टक्के अशिक्षित आहेत. हिंदू विवाहित मुलीमध्ये 72 टक्के या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या आहेत; असे या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
या अहवालामध्ये धर्मनिहाय विवाह वयाचा तपशील उघड झाला आहे. जैन समाजामध्ये विवाहाचे सरासरी वय सुमारे 20 वर्ष 8 महिने, ख्रिश्चनांमध्ये 20 वर्ष 6 महिने, शिखांमध्ये 19 वर्ष 9 महिने असून सर्वात कमी सरासरी विवाह वय हे हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये 16 वर्ष 7 महिने आहे. शहरी भागातील महिला ग्रामीण भागातील महिलांच्या तुलनेत सरासरी दोन वर्षे उशीराने विवाह करतात. त्याचबरोबर अल्पवयीन गर्भधारणा तसेच अल्पवयीन मातृत्वाचे प्रमाण अशिक्षित स्त्रियांमध्ये सुशिक्षित स्त्रियांपेक्षा तब्बल 9 पट अधिक आहे. वयाच्या 10 वर्षापूर्वी झालेल्या 5 लाख 40 हजार विवाहांमध्ये 80 टक्के मुली 10 वर्षाखालील वयाच्या असतात. अशा माहितीवरून शिक्षण आणि अल्पवयीन विवाहाचा संबंध या अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे.
विकसनशील देशांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने असल्याने विशेषत: मुलींचे विवाह लवकर होतात; असा दावा जागतिक बँकेचे शिक्षण सल्लागार ओडॉन यांनी केला असून चांगल्या, सुरक्षित रोजगारच्या संधी आणि पायाभूत सुविधा यातून ही परिस्थिती सुधारू शकते असेही त्यांनी नमूद केले आहे.