Breaking News

आर्थिक सुधारणांना वेग देणार: जेटली

जोयिता डे ओसाका, दि. 02 - भारताला आर्थिकदृष्ट्या विकसित देश बनविण्यासाठी आणि सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम ठेवण्यासाठी केंद्र  सरकार आर्थिक सुधारणांना अधिक वेग देईल; अशे ग्वाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
आपल्या जपान दौर्‍यात ओसाका विद्यापीठात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना अर्थमंत्री म्हणाले की; भारतासमोर असलेल्या  संधींचा लाभ उठविण्याच्या दृष्टीने आर्थिक सुधारणांची प्रक्रिया पुढे नेणे आवश्यकच आहे. त्यानंतरच गरीबी नष्ट करण्यासारख्या मूलभूत उद्दीष्टांना साकार करता  येईल; असे जेटली यांनी नमूद केले.
संपूर्ण जगभरात आर्थिक मंदीचे वातावरण असताना भारताच्या विकासाला पूरक भूमिकेने जानेवारी ते मार्च 2016 या तिमाहीत 7.9 टक्के आणि एकूण वर्षभरात  7.6 टक्के एवढा विकासदर राखण्यात आपल्याला यश आले; याकडे जेटली यांनी लक्ष वेधले.
जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही ओळख कायम ठेवण्यास भारताला यश मिळेल आणि त्यामुळेच एक विकसनशील अर्थव्यवस्था ते विकसित  अर्थव्यवस्था हा प्रवास भारत यशस्वीपणे पूर्ण करू शकेल; असा दावाही अर्थमंत्र्यांनी केला.