गुलबर्गा सोसायटी हत्याकांड प्रकरणातील 24 आरोपी दोषी
अहमदाबाद, दि. 02 - विशेष न्यायालयाने गुजरातमधल्या गुलबर्गा सोसायटीमधील जळीतकांड प्रकरणी 24 आरोपींना दोषी ठरवले तर 36 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाने आपल्या निकालपत्रात 2002 च्या गुजरात दंगलीदरम्यान गुलबर्गा सोसायटीवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित नसल्याचे नमूद केले आहे. दोषी ठरवण्यात आलेल्या 24 आरोपींमधील 11 जणांवर हत्येचा आरोप सिद्ध झाला असून इतर 13 जणांना इतर आरोपांबाबत दोषी ठरवण्यात आले आहे. दोषींना सहा जूनला शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष न्यायालयाने दिलेल्या या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे याचिकाकर्त्या झाकिया जाफरींनी सांगितले आहे. या जळीतकांडात झाकिया जाफरी यांचे पती आणि काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी ठार झाले होते. गेल्या सात वर्षांपासून विशेष न्यायालयात वेगवेगळ्या चार न्यायाधिशांसमोर या जळीतकांडावर सुनावणी सुरू होती.