Breaking News

जिल्हा मुख्यालयी वसतीगृह बांधावेः एमआयएमची मागणी

बुलडाणा, दि. 06 - 12 व्या पंच वार्षिक योजनेत केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमातंर्गत एम.एस.डी.पी. अल्पसंख्याक समाजातील मुलांसाठी 100 प्रवेश क्षमतेच्या 01 वस्तीगृह इमारत खामगाव येथे न बांधता जिल्ह्याचे मुख्यालय स्थान  असणा-या बुलडाणा येथे बांधण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलीम या संघटनेने आज 4 जून रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांचेकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 12 व्या पंच वार्षिक योजनेत केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमातंर्गत एम.एस.डी.पी. अल्पसंख्याक समाजातील मुलांसाठी 100 प्रवेश क्षमतेच्या 01 वस्तीगृह इमारत खामगाव येथे बांधण्याची परवानगी अशोक गायकवाड अव्वर सचिव महाराष्ट्र शासन यांनी दिली आहे. तरी जिल्ह्याचे मुख्यालय बुलडाणा असुन मध्यवर्ती ठिकाण आहे. वरील योजनेअंतर्गत बुलडाणा शहरात 100 प्रवेश क्षमतेचे एक वस्तीगृह बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर एमआयएम तालुकाध्यक्ष समीर खान, प्रभारी सचिव डॉ.मुवीन खान, हफीज खान, माजीद कुरैशी, शाकीर रजा, अरबाज खान यांच्या सह्या आहेत.