शेतकर्यांची कर्जप्रकरणी तात्काळ मंजूर कराः काँग्रेसची मागणी
बुलडाणा, दि. 03 - कर्ज प्रकरणे लवकर मार्गी लावून श्शेतक-यांना नाहक त्रास देवू नका अशी आग्रही मागणी चिखली तालुका काँग्रेसने दि 30 मे रोजी शाखा व्यवस्थापकांकडे निवेदनाव्दारे केली. आमडापूर येथील स्टेट ऑफ इंडीया शाखा येथे शेतक-यांना कर्ज पुनर्गठणासंदर्भात अडचणी येत होत्या. व कर्ज प्रकरणे लवकर मंजूर होत नाही असे गा-हाने आमदार राहुल बोंदे्र यांच्याकडे मांडल्यानंतर आ. बोंद्रे यांनी चिखली तालुका काँग्रेस पदाधिका-यांना बॅकांना कर्ज पुनर्गठण का होत नाही यासंबधी जाब विचारण्याच्या सूचना केल्या. याचीच कार्यवाही म्हणून चिखली तालुका अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, प्रशासक बाजार समिती समाधान सुपेकर, संचालक बाजार समिती ज्ञानेश्वर सुरूशे, विजय पाटील, जिल्हा युवक कॉग्रेस महासचिव राम डहाके, रामधन मोरे, भारत खाजभागे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
बँकेला दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, दृष्काळी परिस्थीतीमुुळे शेतकरी त्रस्त असल्याने पिक कर्ज भरू शकत नाही, अशावेळी शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करून त्यांना नविन पिक कर्जाचे वाटप करणे आवश्यक आहे. शासनाच्या निर्णयानुसार नियमीत जुन्या खातेदारांना मालमत्तेचे सर्च रिपोर्ट देण्याची आवश्यकता नाही. तसेच गहाणखाताची सुध्दा आवश्यकता नाही. असे असतांनाही आपल्या बँकेकडून शेतकर्यांना सर्च रिपोर्ट व गहाणखत करण्याचे सांगूण नाहक आर्थीक भृर्दंड व मानसीक त्रास देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुष्काळी परिस्थिती शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करून व जाचक अटी न लादता पिक कर्जाचे त्वरीत वाटप करण्यात यावे, अन्यथा तालुका कॉगे्रस कमिटी व युवक कॉगे्रसच्या वतीने शेतकर्यांना सोबत घेवून आंदोलन छेडण्यात येईल.
निवेदन देतेवेळी भिमराव हिवरकर, गफार पटेल सर, बबनराव सोनटक्के, भागवत वडतकर, नारायण बोराडे, सुरश परिहार, प्रविण इंगळे, बाबुराव सोनवने, अजिज भाई, अजबराव इंगळे, गजानन घनघाव, श्शेख हरून, यांच्यासह सावरखेड, कव्हळा, पेनसांवगी, नायगाव बु, सावखेडा बु, धानोरी, मंगरूळ नवघरे येथील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बँकेचे व्यवस्थापक मेश्राम यांनी जुन्या शेतकर्यांना 1 लाख रूपयाच्या आतील कर्जासाठी गहाणखत करावे लागणार नाही. तसेच सर्च रिपोर्ट सुध्दा लागणार नाहीत, आणी हैसियतच्या दाखले सुध्दा घेतल्या जाणार नाहीत असे कबुल केले.