ब्राम्हणी कावा आणि कांगावा
॥नाब्रम्ह क्षत्रमूध्वीती नाक्षत्र ब्रम्ह वर्धते॥ मनुस्मृतीत हा श्लोक आहे, परंतु त्याचा खरा अर्थ लक्षात आला नाही. वेदांची जुळणी संपून काही काळ लोटल्यानंतर म्हणजे इ.स.पूर्वी सुमारे तिसर्या शतकांत मनुस्मृति लिहिली गेली असावी. याविषयी एतद्देशीय व परदेशीय बहुतेक विद्वानांचे एक मत आहे. आतां ज्या श्लोकाचा उल्लेख केला तोच श्लोक ब्राम्हण परकीयांच्या व येथील हिंदू लोकांच्या तहनाम्यातील एक कलम आहे. काल सांगितलेच आहे की, ज्या काळी हिंदूस्थानात परकीयांच्या टोळ्या शिरल्या तेव्हा येथील सर्वच हिंदूलोक रानटी नव्हते. आम्हांत जे राजे शूर, श्रीमान, विद्वान असे होते. त्यांच्याशी परकीयांना विशेष झगडावे लागले. शेकडो वर्षे झगडूनही येथील मूळचे लोक परकीयांच्या ताब्यात येईनात तेव्हा लोकांशी ते सख्य करू लागले आणि असा नियमच आहे. कितीही भिन्न धर्मीय लोक परदेशांत राहिले म्हणजे त्यांच्यात पुष्कळ प्रकारचे संमिश्रण होत जाते व त्याप्रमाणे वेदकालापासून तो स्मृतिकालापर्यंत परकीयांचे व येथील मूळच्या लोकांचे पुष्कळ गोष्टीत संमिश्रण झाले. परंतु मूळच्या लोकांविषयी ब्राम्हणांच्या मनात घोळत असलेला द्वेष विलकुल कमी झाला नाही. भेद इतकाच की, त्या द्वेषाचे थोडे सौम्य स्वरूप होऊन त्याची क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी तीन रूपांतरे झाली. येथील अफाट जनसमुदायापुढे उघड वैर करून आपला टिकाव लागणार नाही असे जेव्हा धूर्त मनूवाद्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी क्षत्रियांवाचून ब्राम्हणांची उन्नती नाही व ब्राम्हणांवाचून क्षत्रियांची उन्नति नाही असा येथील शूर व श्रीमान लोकांच्या तोंडावरून हात फिरवून त्यांना आपलेसे करून घेण्याचा प्रयत्न कला यांत नवल नाही. आम्हा मूळच्या लोकांत परकीयांनी क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा तीन पायर्या उत्पन्न केल्यामुळे आम्ही कालांतराने एकमेकांचा द्वेष करू लागलो! आणि आमच्या या आपसांतील फुटीमुळे परकीयांचा आयताच कार्यभाग उरकला. सारांश, हिंदूलाकांत जे असंख्य जातिभेद आहेत, ते सर्व येथील लोकांविषयी ब्राम्हणांच्या मनात घोळत असलेल्या द्वेषाची रूपांतरे होत. जातिभेद उत्पन्न करण्यांस ब्राम्हणांचे अंग नसते तर त्यांनी 3 हजार वर्षांत ते मोडून टाकण्यासाटी एखादे पुराण रचले असते किंवा अन्य मार्गाने दुसरा एखादा उपाय केला असता.
ब्राम्हणांतील काही विद्वानांचे व युरोपांतील पंडितांचे असे म्हणणे आहे की, मध्य आशियांतील लोकांच्या काही शाखा पूर्वेस हिंदूस्थानकडे गेल्या व त्यांनी तेथे गेल्यावर स्वतःस आर्य म्हणवून घेतले. काही शाखा पश्चिमेकडे गेल्या. त्यापैकी एकीने इराणचे राज्य स्थापले. दुसरीने आथेन्स आणि स्पार्टा ही शहरे वसविली व तिचेच ग्रीक राष्ट्र बनले. परंतु तिने तिकडे आर्य म्हणवून घेतले नाही. तिसरी इटली देशात गेली तिथे तिने सात टेकड्यांवर शहर वसविले. हेच पुढे वाढत जाऊन सार्वभैम राज्याची राजधानी रोम शहर झाले त्यांनी स्वतःला आर्य मानले नाही. ग्रीक, रोमन, इंग्लिश आणि ब्राम्हण या सर्वांचे पूर्वज आशियातील एकाच ठिकाणी राहणारे, एकच भाषा बोलणारे आणि एकाच देवाची उपासना करणारे होते. असे पुष्कळ विद्वानांचे म्हणणे आहे. आता आपण यावर थोडासा विचार करू, ज्याकाळी ब्राम्हणांचे व ग्रीक, रोमन, इंग्लिश वगैरे लोकांचे पूर्वज एकाच ठिकाणी होते, तेव्हा तेथे ते जी भाषा बोलत होते ती काणती भाषा? त्यांचा धर्म कोणता? त्यांचा देव कोणता? या तीन प्रश्नांची उत्तरे पुराणिक बुवांनी द्यावीत. मध्य अशियांत असतांना ब्राम्हण धर्मग्रंथ जर वेदच होते तर त्यांत हिंदुस्थनांतल्या नद्यांविषयी व लोकांविषयी जी वर्णने आहेत ती काय म्हणून आली? बरे वेदांच्या जुळणीचा आरंभ जर हिंदूस्थानात प्रवेश करतांना होत आहे तर ते मध्य आशियात त्यांच्याजवळ नव्हते हे उघड आहे. तसेच पूर्वी त्यांच्या संस्कृत भाषा होती पण हे म्हणणेही पाहिल्याप्रमाणे निराधार आहे. तसेच वैदिककाळाच्या ग्रंथ जुळणीत तुमच्याच लोकांचा सगळा भरणा होता असे पण दिसत नाही. तुम्हा सर्वांची संस्कृत भाषा होती असे म्हणावे तर त्याच काळी त्यांच्यातील काही शाखा पश्चिमेकडे गेल्या. त्यांचीही येथे तीच भाषा चालू रहायला हवी, परंतु तसा प्रकार मुळीच झाला नाही. ग्रीक, रोमन, पार्शी, इंग्लिश या तुमच्या भाऊबंदांच्या वहिवाटीतून संस्कृत भाषा अगिदीच कशी निघून गेली? तींत तेथे एकही ग्रंथ बनला नाही? याचे कारण काय? त्या त्यांच्या भाऊबंदाजवळ वेद नव्हते व संस्कृत भाषेतील मंत्रस्तोत्रेही नव्हतीसें दिसते. त्या परागंदा झालेल्या टोळ्यांना भाषा नसेल असे नाही, परंतु ती वेगळीच आणि अगदी अपक्व स्थिती असली पाहिजे. या प्रवासास निघालेल्या लोकांना त्या त्या देशांतील लोकांच्या भाषेत आचारविचारांत थोडक्याच काळांत मिसळून जावे लागले असेल आणि हे गोर्या रंगाचे धूर्त लोक मूळच्या लोकांच्या साधारण चटचट उचलून कोठे कोठे दोन पावले पुढेही गेले असतील. त्या वेळी नव्यातले जुन्यांत व जुन्यांतले नव्यांत असे पुष्कळ बाबतीत कालांतराने मिश्रण झाले नसेल असे म्हणवत नाही. तरी मूळचे लोक आणि नवे लोक यांच्यात जो भेद राहिला तो अद्यापि या देशांत रूढींच्या रूपाने दृष्टीस पडत आहे. असा भेद अन्य देशात दिसत नाही. यावरून पुन्हा हेच सिध्द होते बहुजन आणि ब्राम्हण वेगळेच आहेत.