भूकंपाच्या धक्क्याने हादरले सुमात्रा
पडांग, दि. 02 - आज सकाळी इंडोनेशियातील सुमात्रा बेटांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला असून रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.5 इतकी मोजण्यात आली आहे.
याबाबत सरकारी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाच्या पूर्व किनार्यावरील पडांग शहराला या भूकंपाचा मोठा धक्का बसला. भूकंपानंतर अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. अद्याप कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू पडांग शहरापासून दक्षिणेकडे 155 किमी अंतरावर होता. सुमात्रा बेटांच्या किनार्यालाही धक्का जाणविला आहे. इंडोनेशियातील सुमात्रा बेटे भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने याठिकाणी सतत भूकंपाचे धक्के बसत असतात.