Breaking News

वर्षभरात सीलबंद होणार भारत-बांगलादेश सीमा

नवी दिल्ली, दि. 03 - गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत भारत आणि बांगलादेशदरम्यान आसाममध्ये असलेल्या सीमेवर भौतिक अडथळे निर्माण करून ही सीमा येत्या वर्षभरात पूर्णबंद सीलबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत-बांग्लादेशदरम्यान आसाममध्ये 223 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा येत्या वर्षभरात संपूर्णपणे बंद करण्यात येणार असून राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गृहराज्यमंत्री किरण रीजीजू, सीमा व्यवस्थापन विभागाचे सचिव सुशील कुमार आणि गृह मंत्रालयाच्या इतर अधिकारी उपस्थित होते. जून 2017पर्यंत सीमा बंद करण्याचे पूर्ण केले जाईल, अशी आशा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. सीमेपार वाहणार्‍या नद्यांकाठचा भाग सीलबंद करण्यासह अन्य सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणींवर मात करून ही सीमा बंद करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत सीमेवर किमान 122 जागी भौतिक अडथळे अस्तित्वात नाहीत, त्यापैकी सुमारे 12 किमी परिसरातील 100 जागांवर भौतिक अडथळे निर्माण करण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.