Breaking News

रमजानला मशिदींमध्ये मोफत तांदूळ वाटणार अम्मा

चेन्नई, दि. 03 - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आज राज्यातील सर्व मशिदींमध्ये रमजाननिमित्त मोफत भात देण्यात यावेत, असे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत.
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सण पुढील आठवड्यापासून सुरू होत असून जयललिता यांनी यानिमित्ताने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात, राज्यातील तीन हजार मशिदींमध्ये 4600 टन तांदळाचे मोफत वाटप करण्यात यावे. यामुळे मुस्लिम बांधवांना सणानिमित्त मोफत भात मिळू शकेल, म्हटले आहे. त्याचबरोबर मशिदींमध्ये तांदळाचे वाटप करण्याचे आदेश राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. तीन हजार मशिदींमध्ये 2.14 कोटी रुपयांचा तांदूळ दिला जाणार आहे. दरम्यान, मुस्लिम बांधवांनी जयललिता यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.