Breaking News

आता जाहिरातीतही आर्ची

सैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुने जाहिरात विश्‍वालाही ‘याड लावलं’ आहे. नुकतेच रिंकूने ‘गो’ एडिबल ऑईल अर्थात खाद्यतेलाचे प्रॉडक्ट लाँच केले आहे. रिंकू राजगुरुच्या हस्ते गजानन ग्रुपच्या ‘गो’ या तेलाच्या ब्रँडचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला सुप्रसिद्ध संगीतकार जतिनही उपस्थित होते. त्यामुळे पुढे-मागे रिंकू जाहिरातीत दिसणार का असा सवालही विचारला जात आहे.
मराठी सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरलेला सैराट कमाईच्या रेसमध्ये सुस्साट आहे. आतापर्यंत या सिनेमाने 80कोटीहून अधिक कमाई केली आहे. केवळ मराठीच नव्हे तर बॉलीवूडमध्येही या चित्रपटाची दखल घेण्यात आली आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांनी सैराटचे तोंडभरुन कौतुकही केले. सैराटची टीम लवकरच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही दिसणार आहे.