दीपिका तेलगू चित्रपटात झळकणार
बाजीराव मस्तानी नंतर एकही बॉलीवूड चित्रपट साईन न केल्याने नाराज झालेल्या दीपिकाच्या फॅन्सना तिच्या बॉलीवूड पटासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल असे समजते. बाजीराव नंतर दीपिका हॉलीवूड पट एक्सएक्सएक्स मध्ये बिझी होती व आता त्यानंतर ती तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी तयार होत असल्याचे समजते. विजय मुरूगदर यांच्या कथ्थी या चित्रपटाचा हा रिमेक आहे असेही सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे या रिमेकद्वारे अभिनेता चिरंजीवी चित्रपटात पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. हा त्याचा 150 वा चित्रपट असेल व 15 वर्षांनंतर तो पुन्हा चित्रपटात काम करणार आहे. त्याच्या अपोझिट दीपिका असल्याची चर्चा असल्याने चिरंजीवीचे फॅन्स मात्र उत्साहात असल्याचेही सांगितले जात आहे. भारतीय शेतकर्यांच्या समस्येवरचा हा चित्रपट आहे.