घुसखोरांकडून अमरनाथ यात्रेला धोका: सुरक्षा दल
जम्मू , दि. 04 - भारत पाकीस्तान सीमेवरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असली तरीही घुसखोरांकडून अमराठ यात्रेला असलेला धोका कायम आहे. हा धोका टाळण्यासाठी काटेकोर बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षा दलांचे प्रयत्न सुरू आहेत; अशी माहिती पोलीस उप महानिरीक्षक अशकूर वाणी यांनी दिली.
जम्मू, सांबा, कठुआ प्रांत भारत-पाक सीमेलगत असल्याने या ठिकाणी घुसखोरांकडून संभाव्य धोक्याची एहेमीच धास्ती असते. या वर्षीच्या यात्रेत गुप्तचर यंत्रणेकडून अद्याप कोणतीही धोक्याची सूचना आली नसली तरीही या धोक्याचे विश्लेषण करून त्यानुसार उपाय योजना करण्यात येत आहेत; असे वाणी यांनी स्पष्ट केले. कोणत्याही संभाव्य धोक्याला समर्थपणे तोंड देण्यास सुरक्षा दल सज्ज असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
यावर्षी 48 दिवस चालणारी अमरनाथ यात्रा 2 जुलैपासून सुरू होणार असून रक्षाबंधनाच्या दिवशी 18 ऑगस्ट रोजी समाप्त होत आहे.