व्हिएतनामला ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकणार भारत
नवी दिल्ली, दि. 04 - भारताने व्हिएतनामला आशियात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकण्याचा निर्णय घेतला असून संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर सिंगापूर आणि व्हिएतनामच्या पाच दिवसांच्या दौर्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौर्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्राबाबत चर्चा होणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून भारताकडे व्हिएतनाम ब्रह्मोसची मागणी करीत आहे. मात्र, आधीच्या काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने चीनच्या भीतीमुळे व्हिएतनामला हे क्षेपणास्त्र दिले नव्हते. हा निर्णय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या परराष्ट्र धोरणातील मोठा बदल मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्र्यांनी या निर्णयाला मान्यता दिली असल्याचे मंत्रालयातील सूत्राने सांगितले. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे ब्रह्मोस विकसित केले असून, हे सर्वांत शक्तिशाली क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते.