अफगाणिस्तानातील 1700 कोटीच्या धरणाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन
हेरात, दि. 04 - आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौ-यावर रवाना झाले असून, ते आज अफगाणिस्तानला पोहोचले आहेत. तेथे त्यांच्या हस्ते 1700 कोटी खर्च करून बनविण्यात आलेल्या ‘सलमा’ डॅमचे उद्घाटन करण्यात आले आहे.
मोदी यांना डॅमच्या उद्घाटनानंतर अफगाणिस्तानातील सर्वोच्च सन्मान असलेल्या अमीर अमनुल्लाह खान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या भाषणात यावेळी भारतीय आणि अन्य देशातील मुस्लिमांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. भारताप्रमाणेच अफगाणिस्तानाही लोकशाही मुळापर्यंत पोहोचली आहे. येथील खेळाडूही अत्यंत उत्तम कामगिरी करतात. आयपीएल आणि कसोटीमध्ये क्रिकेटर्स खेळावे, अशी भावना त्यांनी क्यक्त केले.
अफगाणिस्तान, कतार, मॅक्सिको, स्वित्झर्लंड आणि अमेरिका या पाच देशांच्या दौऱयावर मोदी निघाले आहेत. दरम्यान ओबामांनी निवृत्तीनिमित्त आपल्या निकटवर्तीय नेत्यांना पार्टी देणार असून, 7 जून मोदी अमेरिकेत पोहोचणार आहेत. यावेळी काही महत्त्वाच्या करारावरही स्वाक्षऱया होण्याची शक्यता आहे.