Breaking News

खडसेंच्या मानगुटीवर आता ह्फ्त्याचे भूत

मुंबई, दि. 04 - आधीच खोलात पाय सापडलेल्या महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखी एका भ्रष्टाचाराची भर पडली असून खडसे यांच्या अखत्यारित येणार्‍या मत्स विभागाकडून दरमहा 5 कोटी रुपयांचा हप्ता त्यांना पुरवला जात असे. तसेच 6 महिन्यात 30 कोटींचे हप्ते झाले आहेत. मत्स विभाग, मुंबईचे सहाय्यक आयुक्त युवराज चौगुले हे त्यांच्या अंतर्गत येणार्‍या भागातून कलेक्शन करत. तर सह आयुक्त विनोद नाईक हे त्यावर देखरेख करत होते, असा गंभीर आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे निमंत्रक दामोदर तांडेल म्हणाले, अनेक वेळा यावर आंदोलने झाली असून तेथे 50 बोटी देखील या समितीने पकडल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, असेही ते पुढे म्हणाले. यावर रोख लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 फेब्रुवारी रोजी अधिसूचना काढल्यामुळे खवळलेल्या आणि मासेमारी व्यवसायाचा गंध नसलेल्या खडसे यांनी मागील विधानसभेत 12 नोटीकलच्या बाहेर नवी अधिसूचना काढून मत्स व्यवसायांना परवाने देणार, अशी घोषणा केली.
प्रत्येक राज्याला 12 नोटीकलपर्यत मासेमारी करण्याची परवानगी असते. तसेच त्यासाठी विविध नियम-अटी देखील असतात. तसेच त्याबाहेर मासेमारी करण्यासाठी केद्राची परवानगी आवश्यक असते. तर त्यापुढे आंतरराष्ट्रीय हद्द सुरु होते. त्यामुळे या प्रकरणाची आतात एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी दामोदर तांडेल यांनी केली आहे.