बळीराजाला फक्त 1 रुपयात पोटभर जेवण
सोलापूर, दि. 04 - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुरुवारपासून शेतकर्यांसाठी फक्त एक रुपयात पोटभर जेवण देणारी ब्रह्मपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. रोज शेकडो शेतकर्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था या योजनेमुळे झाली असून ही योजना बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप माने यांच्या संकल्पने
तून साकारली आहे.
सुमारे 950 कोटी रुपये एवढी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल असून रोज बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांची संख्या पाच हजारांवर आहे. येथील बाजार समितीचा राज्यभरात दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील शेतकरी येथे शेतीमाल विक्रीसाठी येतात. किमान दोन दिवस तरी या शेतकर्यांना बाजार समितीमध्ये राहावे लागते. त्यांच्या राहण्याची सोय बाजार समितीत आहे. मात्र, जेवणासाठी बाहेरच्या हॉटेलांवरच अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे एक वेळचे जेवण घेण्यासाठीही किमान 50 ते 60 रुपये मोजावे लागतात. काही शेतकरी दोन ते तीन दिवसासाठी लागणार्या भाकरी बांधून घेऊन येतात, परंतु त्यांना भाजीसाठी किमान 25 ते 30 रुपये मोजावे लागतातच. बाजार समितीचा कारभार सभापती माने यांनी हातात घेतल्यानंतर अनेक योजना राबविल्या. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणून शेतकर्यांसाठी एक रुपयात जेवणाच्या ब्रह्मपूर्ण योजनेकडे पाहिले जात आहे.
शेतकर्यांसाठी ही योजना असली तरी बाजार समिती आणि आडत व्यापारी यांचे त्यात मोठे योगदान असेल. एका ताटासाठी 30 रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी वीस रुपये बाजार समिती आणि दहा रुपये आडते देणार आहेत. शेतकर्यांकडून नाममात्र एक रुपया घेतला जाणार आहे. जेवणात तीन चपात्या, दोन भाज्या, कोशिंबीर आणि भात यांचा समावेश असेल.