सायना, श्रीकांतच्या रँकिंगमध्ये वाढ
दिल्ली, दि. 18 - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह किदांबी श्रीकांतच्या रँकिंगमध्ये दोन स्थानांनी वाढ झाली आहे. जागतिक बॅडमिंटन फेडरेशनच्या ताज्या क्रमवारीत सायना सहाव्या स्थानी आहे.
गेल्या आठवडयात झालेली ऑस्ट्रेलियन ओपन सुपरसीरिज स्पर्धा जिंकलेल्या 26 वर्षीय सायनाने आपली गुणसंख्या 75,369वर नेली. महिला एकेरीतील अन्य भारतीयांमध्ये पी. व्ही. सिंधू दहाव्या स्थानी कायम आहे. पुरुष एकेरीतील ताज्या क्रमवारीत श्रीकांत 11व्या स्थानी आहेत. त्याने 25,086 गुण मिळवलेत.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी न होता सरावाला प्राधान्य देणा-या अजय जयरामचे रँकिंग चार स्थानांनी घसरले आहे. ताज्या क्रमवारीत तो 24व्या स्थानी आहे. दुखापतीतून सावरणारा एच. एस. प्रणॉय 28व्या स्थानी आहे. त्याचे रँकिंगही चार स्थानांनी घसरले.
पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि बी. सुमीथ रेड्डी जोडीची घसरण झाली. ताज्या क्रमवारीत ते 21व्या स्थानी आहेत. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाचेही रँकिंग घसरले. ही जोडी 16व्या स्थानी आहे.