विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा महिला काँग्रेसचा उपक्रम स्तृत्य
। महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष सुभाष गुंदेचा यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 18 - आपल्या नेत्यांना वाढदिवस हा त्यांच्या समाजकार्यासाठीचा त्याग, विचारांचा प्रसार करतांना त्यांच्या चांगल्या कार्याचा आदर्श नव्या पिढीसमोर यावा, या हेतूने ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावेडी उपनगरातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्याचा महिला काँग्रेसचा उपक्रम अत्यंत स्तृत्य असाच आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी केले.अहमदनगर शहर जिल्हा महिला काँगे्रेसच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या वाढदिवसानिमित्त बायजाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या नय्यर प्राथ.माध्य.विद्यालयातील मुलांना कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांची गुणवत्ता 98 टक्केच्या दरम्यान असणारी ही एक दर्जेदार शिक्षण देणारी नय्यर शाळा असून, या मुलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि ना.विखे पा. यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ.सविता मोरे यांनी आपल्या स्वागतपर भाषणात दिली. संघटनेच्या कार्याध्यक्षा मंगल भुजबळ, डिंपल शाही, माजी नगरसेविका संध्या पवार, प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा हंडे आदींनी उपक्रमामागचा उद्देश सांगितला. शाळेच्या कामकाजाची माहिती माध्य.शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार यांनी दिली. प्रास्ताविक माजी नगरसेवक निखील वारे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संध्या मेढे यांनी करुन आभार मानले. कॉ.शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष फिरोज खान, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार व सुनिल भिंगारे, पदाधिकारी अभिजित कांबळे, अरुण बसापूरे, मुकूंद लखापती, शाळेचे घोगरकर सर, मोरे सर आदी उपस्थित होते.