अडचणीतील शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करणार ः संजय राठोड
बुलडाणा, दि. 05 - दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. ही परिस्थिती शेतकर्यांमध्ये नकारात्मक भूमिका निर्माण करीत आहे. या संकटसमयी अडचणीत असलेल्या शेतकर्यांना शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा प्रयतक् होत आहे. शेतकर्यांनी या परिस्थितीला तोंड देण्यासाठी धैर्याने पुढे यावे. नकारात्मक भूमिका सोडून सकारात्मक भावनेने परिस्थितीकडे बघावे, असे आवाहन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज केले.
खामगांव येथील गांधी चौकात शिवसेना पक्षाच्यावतीने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना खते, बियाणे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, खासदार अनिल देसाई, आमदार संजय रायमूलकर, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार विजयराज शिंदे, जालींधर बुधवत, दत्ता पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मराठवाडा व विदर्भातील तब्बल 27 हजार गावांमध्ये दुष्काळ पडला असल्याचे सांगत राज्यमंत्री श्री. राठोड म्हणाले, मोफत बियाणे व खत वाटपामुळे शेतकर्यांना हातभार लागणार आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना प्रत्येक शेतकरी खते, बियाण्यांची व्यवस्था लावित आहे. अशा स्थितीत मिळालेले बियाणे व खते शेतकर्यांचा निश्चितच लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे शासनाकडून मिळणारी सर्व मदत शेतकर्यांना देण्याचा प्रयतक् केल्या जाणार आहे.
कार्यक्रमाप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, हवालदील असलेल्या शेतकरी बांधवांना पीक कर्ज, कृषि निविष्ठा देण्यासाठी मोठी मदत या परिस्थितीत होणार आहे. खासदार अनिल देसाई यांनीही यावेळी आपले विचार मांडले. प्रास्ताविक दत्ता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन अनिल अमोलकार यांनी, तर आभार प्रदर्शन दत्ता पाटील यांनी केले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.