Breaking News

जिल्हा भाजपाच्या वतीने गोपीनाथजी मुंडे यांना श्रध्दांजली अर्पीत

बुलडाणा, दि. 05 - स्व.गोपीनाथजी मुंडे म्हणजे संघर्षातलं एक वादळ होतं. एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्म घेवून आयुष्यभर संघर्ष करीत लोकनेता उपाधी स्व.मुंडे साहेबांना मिळाली. त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करतांना दाटून येत असल्याच्या भावना, भाजप जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी व्यक्त केल्या.

भारतीय जनता पार्टी बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने आज शुक्रवार 3 जून रोजी सकाळी धृपदराव सावळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्व.गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली अर्पीत करण्यासाठी एका अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्षा सौ.विजयाताई राठी, जिल्हा सरचिटणीस विश्‍वनाथ माळी, भाजयुमोचे भगवान एकडे, ज्येष्ठनेते जगदेवराव बाहेकर, वंजारी समाज सेवा परिषदेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र वाघ, निवृत्ती इलग, मधुकर जायभाये, दत्ता पाटील, दिपक वारे, रामदास मुळे, अ‍ॅड.दिपक पाटील यांचेसह बहुसंख्य पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची उपस्थित होते.