एनआयएचे इसिसविरुद्ध आरोपपत्र
नवी दिल्ली, दि. 04 - एका विशेष न्यायालयात इस्लामिक स्टेटच्या (इसिस) संशयिताविरुद्ध राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) आपले पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. देशभरात दहशतवादी कटाची सूत्रे सांभाळण्याबरोबरच संघटनेची भरती मोहिम राबवण्याचे त्याच्यावर आरोप आहेत. येत्या 9 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
भारतातील मुस्लिम युवकांना इसिस संघटनेत भरती होण्यासाठी प्रेरित व प्रवृत्त करून इराक आणि सिरीयातील संघटनेच्या हिंसाचाराच्या मोहिमेत रुजू करण्याचा आरोप गतवर्षी डिसेंबर महिन्यात अटक केलेल्या नासेर पक्कीर याच्यावर होता, तसेच या दहशतवादी संघटनेच्या भारतातील हिंसाचाराच्या नियोजनाची सूत्रे चालवण्याची जबाबदारी नासेरकडून पार पाडली जात असल्याचा संशयही यंत्रणेला होता. या आरोपांच्या समावेशासह आज राष्ट्रीय अन्वेषण विभागाने जिल्हा न्यायाधिश अमरनाथ यांच्याकडे आपले पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. नासेरने सोशल मिडीयाचा वापर करून अनेक भारतीय मुस्लिम युवकांना इसिसकडे आकर्षित केलेले आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून या दहशतवादी संघटनेची माहिती भारतातील स्थानिक स्तरावर पोहोचवण्याचे काम त्याने अत्यंत सफाईदारपणे पार पाडलेले आहे.
भारतीय मुस्लिम युवकांना आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने इराक, सिरीयात पाठवून तिथल्या हिंसक कारवायांत सहभागी करण्याची त्याची मोहिम जोमाने सुरू होती. या सर्व आरोपांचा समावेश एनआयएने आपल्या आरोपपत्रात केला असून न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी येत्या 9 जून रोजी होणार असल्याचे स्पष्ट करत नासेरच्या न्यायालयीन कोठडीत 9 जूनपर्यंत वाढ केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एनआयएने गतवर्षी 9 डिसेम्बर रोजी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. सुदानी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांनी इस्लामिक स्टेटमध्ये भरती होण्यासाठी सिरीयात जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक करण्यात आल्याचे सांगत नासेरला 5 आक्टोबर 2015 रोजी भारत सरकारकडे सोपवले होते.10 डिसेम्बर 2015 रोजी भारतीय यंत्रणेने त्याला अधिकृतरीत्या ताब्यात घेऊन त्याच्यावरील आरोपांचा सखोल तपास सुरू केला होता.