दिल्ली मेट्रो सौर ऊर्जेवर धावणार
नवी दिल्ली, दि. 04 - मेट्रो रेल्वे चालविण्यासाठी रिवा अल्ट्रा मेगा सौर लिमिटेड (आरयूएमएसएल) सोबत दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने (डीएमआरसी) वीज खरेदी करार केला असून डीएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंह आणि आरयूएमएसएलच्या वतीने मध्य प्रदेशचे नवीन तथा नवीकरणीय ऊर्जा विभागाचे प्रमुख सचिव मनू श्रीवास्तव यांच्यात हा करार झाला.
डीएमआरसीचे श्रीवास्तव यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, डीएमआरसी पुढील वर्षापासून आरयूएमएसएलकडून प्रतिदिन 150 ते 200 मेगावॅट वीज खरेदी करेल. आरयूएमएसएल हा जगातील सर्वांत मोठा सौर ऊर्जा प्रकल्प असून, येथे सर्वाधिक 750 मेगावॅट वीज उत्पादन होते. हा प्रकल्प रिवा जिल्ह्यात सुरू आहे. या कंपनीकडून वीज खरेदी करून राजधानी दिल्लीत सौर ऊर्जेवर मेट्रो चालविण्याचे नियोजन केल्यामुळे पुढील वर्षापासून दिल्ली मेट्रो सौर ऊर्जेवर चालणार आहे.
आरयूएमएसएल प्रकल्पांचे 250 मेगावॅटचे दोन प्रकल्प आणि या प्रकल्पांच्या तीन शाखा जून 2017 मध्ये सुरू होणार आहेत. अर्थात, त्याचवेळी वीज उत्पादन सुरू होणार आहे. त्यामुळे त्यातून मेट्रो चालविण्यासाठी लागणारी वीज मिळेल. अर्थात मेट्रोसाठी दररोज सरासरी 150 ते 200 मेगावॅट विजेची गरज भासणार आहे. करारानुसार ती विीज उपलब्ध होईल. राजधानी दिल्लीत प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिल्ली सरकार अटोकाट प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टीने या सौर ऊर्जा कराराचे महत्त्व अधिक आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांतून मेट्रोला वीज घेण्यात येणार असल्याने प्रदूषण रोखण्यासही मदत होणार आहे. या अगोदर दिल्ली सरकारने राजधानीतील प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच शहरात सम-विषम योजना सुरू करण्यात आली. त्याचाही प्रदूषण रोखण्यात फायदा झाला असून, प्रदूषण रोखण्याचे दिल्ली सरकार आणि जनतेचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले जात आहे.