। राष्ट्रीय संत बद्रीनाथ तनपुरे महाराजांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार । प्रा.गाडे यांचे प्रतिपादन
पाथर्डी, दि. 03 - दुष्काळी परिस्थिती आणि त्यावर शेतकर्यांनी काय उपाययोजना कराव्यात. यावर यापुढील काळात संत कीर्तनकार मंडळींनी कीर्तनरुपी सेवेतून किमान दहा मिनिटे प्रबोधन करावे. असे प्रतिपादन शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख पा. शशिकांत गाडे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र दगडवाडी येथे वारकरी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्टीय संत बद्रीनाथ तनपुरे महाराजांचा ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छगन महाराज मालुसरे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शशीकांत गाडे, उपजिल्हापमुख अनिल कराळे, ज्येष्ठ नेते सुनील साखरे, रवी चव्हाण, सुरेश साखरे, सत्यभामा तनपुरे, सरपंच बापूसाहेब शिंदे, उपसरपंच कैलास शिंदे, सुखदेव काळे, देविदास शिंदे, सचिन शिंदे, सुखदेव काळे, देविदास शिंदे, सचिन शिंदे, भागवत शिंदे, डॉ. संमत शिंदे, अशोक तनपुरे, साहेबराव शिंदे, अनिल भाकरे आदी उपस्थित होते. यावेळी पा. गाडे म्हणाले शिक्षकांचे विद्यार्थी ऐकतो त्याचप्रमाणे संत मंडळीचे शेतकरी हमखास ऐकतात. त्यामुळे यापुढील काळात अध्यात्माबरोबरच दुष्काळाचे कारण, या विषयावर किमान दहा मिनिटे संतांनी कीर्तनातून प्रबोधन करावे, सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. भविष्यकाळात दुष्काळी परिस्थिती निर्माण होवू नये. यासाठी उपाययोजना करण्याची गरज असून, त्यासाठी संत मंडळीचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. असे गाडे यावेळी म्हणाले. मिळालेले अध्यक्षपद हे राष्टसंत तनपुरे बाबांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून मला अध्यक्षस्थान दिले. मी तर एक निमित्त आहे असे बद्रिनाथ महाराज म्हणाले, अनिल कराळे म्हणाले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करंजी घाट रस्ता, पाझर तलाव दुरुस्ती तसेच दगडवाडी गावामध्ये हायमॅक्स बसविले जाणार आहेत. दगडवाडी देवस्थान तीर्थक्षेत्रात घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते देखील लवकरच करणार असल्याचे कराळे यावेळी म्हणाले.