व्यसनमुक्तीसाठी सचिनचा पुढाकार
तिरुअनंतपुरम, दि. 02 - केरळमधील व्यसनमुक्ती मोहिमेचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर हा मुख्य चेहरा असणार असल्याची घोषणा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केली. राज्यात मादक पदार्थांविरोधात जागरुकता मोही
म सरकार चालवेल, या मोहिमेचा सचिन महत्त्वाचा भाग असेल असे विजयन यांनी म्हटले.
मधूमेहाच्या एका मोहिमेत देखील तेंडुलकर दानिशक फार्मसी कंपनीशी निगडित आहेत. कंपनीने याची घोषणा जानेवारीमध्ये केली होती. सचिनने केरळमधील माकपा समर्थित एलडीएफ सरकारच्या विनंतीला होकार दर्शविला. केरळमध्ये मादक औषधे आणि दारू विरोधात एका मोहिमेत सचिनच्या नावाचा वापर केला जाईल. केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबच्या सहमालकासह सचिन तेंडुलकरसोबत सचिवालयात भेट झाली असे विजयन यांनी म्हटले. सचिन राज्याचा अग्रदूत बनण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी यावर नंतर चर्चा होईल असे उत्तर दिले.
राज्यात युवा प्रतिभांना प्रशिक्षित करण्यासाठी लवकरच एक निवासी फुटबील अकॅडमी स्थापन केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. केरळ फुटबॉलप्रेमींसाठी ओळखला जातो. येथून लवकरच आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू बाहेर पडतील असे सचिनने यावेळी म्हटले. या कार्यक्रमाला अभिनेत्यापासून नेता बनलेला चिरंजीवी, अभिनेता अक्किनेनी नागार्जुन आणि प्रसाद तसेच राज्याचे क्रीडामंत्री ई.पी. जयराजन, अर्थमंत्री टी.एम. थॉमस उपस्थित होते.