अजित जोगी काँग्रेसमधून बाहेर
रायपूर- 20- छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी गुरुवारी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आहेत. लवकरच ते नवीन पक्षात प्रवेश करणार आहेत. काँग्रेस पक्षात महत्त्व मिळत नसल्याचे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे जोगी यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना जोगी म्हणाले, ‘पक्षातून बाहेर पडण्यापूर्वी अनेक नागरिकांशी चर्चा केली आहे. काँग्रेस पक्ष हा नेहरू व राजीव गांधी यांचा पक्ष आता राहिलेला नाही. पक्षाला काम करणाऱयांची किंमत नाही. छत्तीसगडमध्ये रमन सिंग यांची ‘बी-टीम‘ आहे. लवकरच नवीन पक्षात प्रवेश करणार आहे.‘