Breaking News

सोमवारी दहावीचा निकाल जाहीर होणार

15 जूनला मिळणार मार्कशीट 

पुणे, दि. 5 - बहुप्रतीक्षित दहावी इयत्तेचा निकाल 6 जूनला म्हणजेच सोमवारी जाहीर होणार असल्याची माहिती पुणे शिक्षण मंडळाने दिली आहे. दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल सोमवारी, 6 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 15 जूनला मार्कशीट मिळणार आहे.
यंदा दहावीला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले असून, निकालाची तारीख जाहीर झाल्यानं 10वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शिक्षण बोर्डाच्या ुुु.ारहीर्शीीश्रीं.पळल.ळप आणि ुुु.ाीलीहीश.रहल.ळप या वेबसाइटवरही निकाल पाहायला मिळणार आहे. राज्यमंडळ कार्यालयातील ’शारदा’ सभागृहात दहावीच्या निकालासंदर्भात उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदही आयोजित केली आहे. पत्रकार परिषदेत शिक्षण मंडळाकडून राज्यातील टक्केवारीसंदर्भात माहिती देण्या
त येणार आहे.